दिपक मसूरकर
तालुका प्रतिनिधी रिसोड
रिसोड : डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय रिसोड येथील राष्ट्रिय सेवा योजना एकक अंतर्गत अनुषंगाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले.
दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. मनुष्य आणि पर्यावरण यांचं अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. परंतु माणूस आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. वृक्षतोड होतेय, समुद्र-नद्या प्रदूषित केल्या जात आहेत. 1972 पासून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राने 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी आपण सर्व जण ही शपथ घेऊ की १ व्यक्ती १ झाड लागलं च पाहिजे. आणि आपल्या मुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही. सदरील वृक्षरोपण व जागतिक पर्यावरण दीन साजरा करणे हेतू कृषि महाविद्यालय रिसोड येथील प्राचार्य डॉ.आशिष अप्तुरकर