अजिज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : इथून अंदाजे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या, पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या सावळेश्वर या गावी, खुलेआम दिवसाढवळ्या अवैध रेतीचे ट्रॅक्टर जोरात चालू असून, ही अवैध रेतीची तस्करी करणारे ट्रॅक्टर चालक शासनाचे जावई आहेत का? असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत. रात्रीचं सोडा पण दिवसा सुद्धा चार चार ट्रॅक्टर सावळेश्वर मध्ये अवैध रेती तस्करी करीत आहेत. याकडे तलाठी का दुर्लक्ष करीत असेल? याचा अर्थ त्यांच्यामध्ये आर्थिक दिवाण घेवान तर झाली नसेल ना? असा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्र सरकारने सहाशे रुपये ब्रास रेती ग्राहकांना देणार असल्याचा जीआर काढला, परंतु सावळेश्वर मध्ये दिवसाढवळ्या सुद्धा अवैध रेती तस्करी सुरू असून, जवळपास पाच ते सहा हजार रुपये ब्रास रेती विक्री केल्या जात आहे. अक्षरशः भ्रष्टाचाराने शासनाला पोखरून काढण्याचे काम सुरू असून, स्थानिक तलाठी व तहसीलदार हे यांच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. स्थानिक पोलीस प्रशासन व सरपंचाचेही दुर्लक्ष या भ्रष्टाचारात अप्रत