शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी : अस म्हणतात……”निसर्गाची किमया ही अदभूत आणि अनाकलनीय असते” याच वास्तव स्वरूप आपल्या अवती-भोवती देखील अनुभवता येत. सेलू पासुन अवघ्या ५-६ किमी अंतरावर पावडे हादगाव शिवारातील राज्य रस्त्यालगत असलेल्या ६०- ७० फुट खोल दगडी खाणीतून अगदी वरच्या कपारीत काळ्याकभिन्न दगडात बहरलेले पिंपळ वृक्ष सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहेत. सध्या उन्हाळ्यात दगडी खाणीतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे दगडाच्या कपारीत बहरलेल्या या पिपळवृक्षाची दगडी खाणीत लोंबकळणारी मुळे पाहून आश्चर्य वाटत की ही एवढी मोठी झाडे एका बाजूने पुर्ण मुळे बाहेर लोंबकळत असताना कशी तग धरून उभी आहेत. यातुनच मानवजातीला फार मोठा संदेश/विचार हे पिंपळ वृक्ष देतात. ना कुणाचा आधार हवा ना कुणाची मदत, मनात हवी फक्त आणि फक्त जगण्याची उमेद आणि बहरण्याची जिद्द….. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिजामाता विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री भगवान पावडे सर व श्री दत्ता पावडे यांनी ६०-७० फुट खोल दगडी खाणीत उतरून या पिंपळ वृक्षाची सुंदर छायाचित्रे टिपली….


