विश्वास काळे ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
माननीय महोदय जिल्हा रेशीम अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे धानोरा (सा.) ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील रेशिम शेतकरी यांनी चांगल्या प्रकारे रेशीम कोष उत्पादन सुरु आहे व तसेच आमच्या गावचे रेशीम खालील शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत व 2015 पासुन रेशीम शेती करत आहेत. १) प्रकाश बालाजी काळे २) विजय भगवान काळे ३) शिवाजी दादाराव काळे ४) प्रशांत भिमराव शिराळे ५) विलास देवराव कानकाटे ६) शामराव दिलीपराव मुधळे ७) दिगांबर माधव काळे ८) रामराव गणपतराव काळे ९) सुशिल दिलीपराव मुधळे इत्यादी रेशिम शेतकरी. रेशीम शेती ही ईतर पांरपारिक पिकापेक्षा खुप फायदेशिर आम्हाला ठरत आहे व त्यातुन आम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे. एक एकर क्षेत्रामध्ये आम्हाला प्रत्येक बॅचला 80 हजार ते 90 हजार रुपया पर्यंत उत्पन्न होत आहे. त्यामुळे आम्हाला रेशीम शेती खुप खुप फायद्याची ठरत आहे. वर्षाकाठी एक एकरमध्ये चार ते पाच बॅच निघत आहेत. एक एकर एकर क्षेत्रामध्ये वर्षाकाठी 3.50 ते 4 लाख रुपये खर्च वजा जाता उत्पन्न मिळत आहे.
रेशीम बाल किटक संगोपन केंद्र विडुळ श्री सिध्देश्वर बिच्चेवार यांची चॉकी आम्हाला चांगल्या प्रकारे भेटली व योग्य प्रकारे मार्गदर्शन सुध्दा मिळाले व तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे उपसंचालक महाराष्ट्र राज्य रेशीम संचालय नागपुर श्री महेंद्रजी ढवळे सर, जिल्हाचे रेशीम विकास अधिकारी यवतमाळ श्री विलास शिंदे सर, शेतक-यांच्या बांधावर जाऊन माहीती देणारे श्री कुंदन चव्हाण साहेब व ग्राम रोजगार सेवक धानोरा (सा.) दत्ता नारायण कदम यांचे खुप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळाले


