विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा ब्रिटिश कालीन जुन्या रेल्वे लाईन वरील डिकसळ कोंढार चिंचोली पुलाचे गेल्या पाच महिन्यापूर्वी साईटच्या बांधकामाचे काही दगड निखळले होते त्यामुळे या ठिकाणी मोठा बोगदा पडला होता. त्यावेळी संबंधित बांधकाम अधिकारी यांनी या पुलावरील वाहतूक बंद केली होती. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे पावसाच्या पाण्याने हा बोगदा मोठा होऊन पुलाची आणखी हानी होऊ नये तसेच ब्रिटिश कालीन पुलाचे जतन व्हावे म्हणून बारामती ॲग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी पुढाकार घेऊन बारामती अग्रो कारखान्याच्या मार्फत या ढासळलेल्या बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे. यावेळी बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे कोंढार चिंचोलीचे सरपंच शरद भोसले उपस्थित होते. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी जुन्या संपूर्ण पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडे दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा प्रस्ताव सादर केला आहे. तसेच नवीन पुलाचे टेंडर झाल्यामुळे नवीन पुलाची उभारणी होईपर्यंत हा जुना पूल हलक्या स्वरूपाच्या वाहतुकीसाठी वापरता येणार आहे. या कामामुळे बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


