रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
मौजे खंडाळा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा अंतर्गत नरेंद्र राठोड तालुका कृषी अधिकारी तेल्हारा व मंडळ कृषी अधिकारी हिवरखेड गौरव राऊत यांच्या मार्गदर्शनात मौजे खंडाळा येथे खरीप हंगाम 2023 नियोजनाच्या दृष्टीने व स्मार्ट कॉटन प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने खरीप हंगाम पूर्व सभेचे आयोजन केले असता सभेमध्ये यावर्षी घ्यावयाच्या पीक नियोजनाबाबत तसेच सोयाबीन व कापूस लागवड तंत्रज्ञान, घरचे सोयाबीन बियाण्याचा वापर ,बीज प्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी चाचणी इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मुख्यमंत्री शाश्वत शेती योजना अंतर्गत शेततळे, कृषी विभागाच्या विविध योजना व आपातकालीन पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी केले.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग योजना मध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घेण्याचे आवाहन कृषी सहाय्यक मनोज कुमार सारभुकन यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील राजनकर कृषी सहायक यांनी केले आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक महेश इंगळे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कृषी सहाय्यक प्रकाश पेठे, विठ्ठल बिहाडे यांनी सहकार्य केले. सदर सभे करिता गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते..
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)