विश्वास काळे, ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
हिंदवी स्वराज्याचे सर संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिन ग्रामपंचायत कार्यालय धानोरा येथे साजरा करण्यात आला. संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे बघितले जाते भारत देशात अनेक थोर राजे महाराजे होऊन गेले पण रयतेने केवळ छत्रपती शिवरायांना आपला राजा मानले हे विशेष जिद्दीने निर्भीडपणे शत्रूला सामोरे जाऊन छत्रपती विजय प्राप्त केला व महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या किल्ल्याचे वैभव आणि समुद्रातील आरमार ही छत्रपती शिवाजी महाराजांची देणगी होईल छत्रपतींचे नाव घेताच हजारो तरुण एका जागी येतात हा त्यांचा प्रमुख पराक्रमाचा जादुई करिष्मा म्हणावा लागेल.
यावेळी बोलताना माधव काळे शिक्षक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यावेळेस कोणालाही राज्याभिषेक केल्याशिवाय राजा मानले जात नव्हते राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसानंतरच जिजाऊ मा साहेबांची देवाज्ञा झाली व तिथून छत्रपती शिवरायांनी उत्तम प्रकारे स्वराज्याचा गाडा हाकला माझ्या जीवनामध्ये रायगडाच्या पायथ्याशी दहा वर्ष राहण्याचा योग आला होता असे सुद्धा काळे सर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला धानोरा गावचे उपसरपंच अवधूत हमड सदस्य संतोष शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका गावातील कार्यकर्ते संजू पाटील प्रकाश काळे अवधूत बायदे शंकर मसाज काळे माजी उपसरपंच धोंडबा काळे बालाजी काळे एलआयसी प्रतिनिधी मारुती सोनबा काळे व इतरही मान्यवर उपस्थित होते