अजिज खान
शहर प्रतिनीधी ढाणकी
ढाणकी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ९ वा. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक येथे, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. ११ ते ३ महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपून लगेच ३ ते १० मिरवणूक मार्गे भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. फुलांच्या आरासित सजलेली अहिल्यादेवींची प्रतिमा, अहिल्याबाईं ची वेशभूषा केलेली चिमुकली मुले अन् जातीपातीचे बंधन तोडून एकत्र आलेली तरुणाई मिरवणुकीतील हे चित्र लक्ष वेधत होते.यावेळी शहरातील सर्व धनगर बांधव ,प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग ,लहान चिमुकले व महिलांचा मोठा सहभाग शोभायात्रेत दिसून आला. ढोल ताशा पथक याने ढाणकी नगरी दुमदुमून गेली होती. शहरातील भजनी मंडळांनी या रॅलीमध्ये विशेष सहभाग घेऊन शोभा यात्रेत अधिकच सुबकता वाढवली.
यावेळी बाळासाहेब पाटील चंद्रे,आनंदराव चंद्रे , भास्कर पाटील चंद्रे, दीपक पाटील चंद्रे, उकंडा लकडे,दिगांबर शिरडकर,तुकाराम वैद्य, दिगांबर वैद्य, आनंदा कामटे,महेश चंद्रे, अवधुत पा. चंद्रे , ओमा पाटील चंद्रे,खंडेराव लकडे,दत्ता हाके,गजानन वैद्य,अक्षय बिट्टेवाड,मारोती बीट्टेवाड,संजय बीट्टेवाड,बंडू चंद्रे, आवधूत शिरडकर,साहेबराव वाघमोडे,ई.धनगर समाज बांधव उपस्थित होते.
या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार संघटना प्रेरीत, अहिल्या जन्मोत्सव समीती ढाणकी यांनी यशस्वीरित्या केले.


