सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले – प्रदेश मीडिया प्रमुख पदासह गत दोन सत्रातील जिल्हा सचिव पदाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मा.प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा यांनी अजय जाजू यांची राज्याचे जनसंपर्क मंत्री पदी नियुक्ती केली. यानिमीत्ताने अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
महेश नवमी कार्यक्रमानिमीत्त तालुका सभेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे नवनिर्वाचीत जनसंपर्क मंत्री अजय जाजू यांचा सत्कार अकोले तालुकाध्यक्ष विजय सारडा यांनी केला. याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक सतीश बुब, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ रा. मुंदडा व समाज बांधव उपस्थित होते. सत्काराला उत्तर देतांना अजय जाजू यांनी समाजसेवेचे बाळकडू अकोल्यात मला मिळाले. तेथे माझा सत्कार होतोय याचा मला अभिमान असल्याचे सांगितले . श्रीराम मंदिरात संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्यास जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ मुंदडा, जिल्हा सदस्य रमेशचंद्र सारडा, गोधाम गोशाळेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा समाज कल्याण कोष चे ट्रस्टी रामनिवास राठी, मॉडर्न हायस्कुल चे चेअरमन सतीश बुब, दानदाता सुनिल डांगरा, अगस्ती देवस्थान चे ट्रस्टी महेश सारडा, मॉडर्न हायस्कुल चे सदस्य महेश सारडा, चेतन बुब, खंडोबा मंदिर देवस्थान चे ट्रस्टी सुरेश करवा, मॉडर्न हायस्कुल प्राचार्या सौ.सविता मुंदडा, प्रायमरी च्या चेअरमन सौ.स्मिता मुंदडा, ज्ञानवर्धिनी चे सदस्य धनंजय जाजू, सौ.स्वाती सारडा, सौ. जयश्री मुंदडा तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक विजय बूब, प्रा. ओंकारनाथ राठी, डॉ. प्रकाश सारडा, श्यामसुंदर मुंदडा, शुभम मणियार, राजेंद्र भळगट, अनिल भळगट, प्रकाश लोढा, सुरेश लोढा, पुरूषोत्तम शर्मा, राजेंद्र साकी, तेजस शहा, सचिन शहा, ज्येष्ठ मार्गदर्शिका सौ.ममता मुंदडा, सौ.स्वाती सारडा, सौ.सुनिता राठी, सौ.ज्योती जाजू, सौ. तृप्ती सारडा, सौ.सोनाली मुंदडा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तालुकाध्यक्ष विजय सारडा, उपाध्यक्ष चेतन बुब, मंत्री विशाल राठी, सहमंत्री आनंद मुंदडा, अर्थमंत्री प्रसाद राठी, संगठन मंत्री निरज मुंदडा आदींनी विशेष परिश्रम घेतले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)