कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्य धम्म क्रांती प्रज्ञापर्व समितीच्या वतीने बुद्ध मोहत्सवचे आयोजन करण्यात आले होते. वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध जयंती च्या निमित्ताने पुसद येथील सर्वच विहरांमध्ये सकाळी बुद्ध वंदना घेण्यात आली.सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान तीन पुतळा चौक येथून समता मार्च ला सुरवात झाली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा यांनी सहभाग घेऊन. भिक्षू संघ व समाता सैनिक दलाचे शिस्त बद्ध पथसंचलन लक्षवेधी ठरले महिलांच्या हाती मेणबत्ती घेवुन शांतता मय सह जीवनाचा संदेश देत हजारो धम्मबांधव महिला भगिनी तथा बालक या मध्ये सहभागी झाले होते हा समता मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ विसर्जित झाला.या ठिकाणी सामूहिक पद्धतीने त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली. भारत कांबळे व भोलानाथ कांबळे यांनी समता सैनिक दला तर्फे विशेष मानवंदना देण्यात आली. समारोपीय कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात साऱ्या विश्वाला बुद्ध हवा हा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये कमलेश पाटील संतोष गायकवाड ओमप्रकाश गवई प्रीती भरणे जनार्दन गजभिये रामेश्वर ताकतोडे राजेश हातमोडे शशांक भरणे उमेश गजभिये स्वरा गवई आदि कलाकारांनी सहभाग घेतला यावेळच्या मिरवणुकीत समाविष्ट करण्यात आलेला देखावा कमळाच्या फुलावर बुद्ध मुर्ती हा आकर्षक देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. हा देखावा मूर्तिकार सुनिल वाघमारे यांनी अत्यंत सुंदर व आकर्षक पद्धतीने बनवण्याचे दिसून आले. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक निवेदन परमेश्वर खंदारे यांनी तर आभार प्रदर्शन किशोर कांबळे यांनी केले या वेळी समता सैनिक दलाचे भारत कांबळे भोलानाथ कांबळे यानी समता सैनिक दलाचे पथ संचलन घेतले.कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर कांबळे नत्तु वाहुळे नारायण ठोके प्रा. महेश हंबर्डे संतोष गायकवाड प्रफुल भालेराव विष्णू सरकटे परमेश्वर खंदारे प्रीतम आळणे राजू पठाडे जगदीश सावळे मुन्ना हाटे संजय वाढवे प्रा. सुनील खाडे विकास मनवर साहेबराव गुजर सुरेश कांबळे बाळासाहेब कांबळे अंबादास कांबळे मधुकर सोनोने रंगराव बनसोड तीन पुतळा उत्सव समिती आदी समितीच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.


