कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयात दि.३० एप्रिल २०२३ रोजी रविवारला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. ग्रामगीतेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाच्या प्रमुख मिनाक्षी खंदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रेया सरनाईक यांनी केले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश धनवे उपमुख्याध्यापक गजानन वायकुळे पर्यवेक्षक राजेंद्र महाजन पर्यवेक्षिका रिता बघेल स्मृती देशपांडे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


