सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : दि 1मे महाराष्ट्र दिन 63व्या वर्धापनाचे औचित्य साधून , मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतुन संकल्प ,निरोगी महाराष्ट्राचा वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाण्याचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात करण्यात आले, त्यातील उमरखेड तालुक्यातील शहरात “आपला दवाखाना “लोकार्पण आज आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. येणाऱ्या काही दिवसात अजुन दोन आपला दवाखाना उमरखेडच्या जनतेच्या सेवेत रुजू होणार आहेत.! आमचे सरकार हे सर्व सामान्य जनतेचे सरकार आहे सदैव जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे, निशुल्क उपचाराची उत्तम सुविधा देण्याचे अविरत कार्य आमचे सरकार करणार आहे.असे प्रसंगी मा. आ. नामदेवराव ससाने बोलत होते.!या प्रसंगी माजी आमदार विजय खडसे, सुदर्शन रावते, प्रवीण पाटील मिराशे, तहसिलदार आनंद देउळगावकर ,न.प. मुख्याधिकारी महेश जामनोर, तालुका आरोग्य अधिकारी मुनेश्वर,डॉ खंबाळकर वैद्यकीय अधिकारी सचिन घाडगे, संदीप घाडगे, विजय रेघाटे सर्व कर्मचारी इत्यादी उपस्थीत होते. “आपला दवाखाना” गणपती मंदिरा जवळ गोरोबा नगर महागाव रोड उमरखेड येथे सुरू झाला असून त्याचा सर्व गरजूनी लाभ घ्यावा.


