बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे : पाटस तालुका दौंड येथे पहिली दौंड तालुका केसरी कुस्ती स्पर्धा अतिशय उत्साहात आणि दिमाखात.नुकतीच पार पडली पै .तुषार डुबे यांने पहिला दौंड तालुका केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी केले तर दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते चांदीची गदा आणि बुलेट गाडी देवून बक्षिस वितरण करण्यात आले. या वेळी आमदार राहुल कुल यांनी आयोजकांचे भरभरुन कौतुक केले.आणि या कुस्ती संकुलनासाठी पुढील महिन्या पर्यंत मँट ची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच दौंड शहरालगत 10 ऐकर क्षेत्रातील होत असलेल्या क्रिडा संकुल मधे कुस्ती आखाडा जागेचे नियोजन केले जाईल असेही सांगितले.आणि तालुक्यातील क्रिडा विभागासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही असे ते शेवटी म्हणाले. व प्रथम बक्षिस बुलेट गाडी हि आमदार राहुल दादा कुल यांचे वतीने देण्यात आली होती. तसेच पै. निखिल कदम हा स्पर्धेचा उपविजेता ठरला. यास दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश (आप्पा) थोरात यांच्या वतीने हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटार सायकल बक्षीस म्हणून त्यांचे हस्ते देण्यात आली.व लहान मोठ्या कुस्त्या अतितटीच्या पहिला मिळाल्या. या ठिकाणी लहान मोठ्या ऐकुण 260 मल्लांच्या लढती पार पडल्या. स्पर्धा आयोजन करण्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वच पाटस व परिसरातील देणगीदारांचे सर्वांचे आभार आयोजकांनी माणले. तसेच या स्पर्धेतील विजेते उपविजेते व सहभागी झालेल्या सर्वच मल्लांचे स्वागत करण्यात आले. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोटेवाडा कुस्ती केंद्राचे वस्ताद पैलवान संभाजी खडके. योगेंद्र शितोळे. सत्वशिल शितोळे.अरूण भागवत. बापू भंडलकर. सोपानराव मोहिते.यांनी मागिल 15 दिवसापासून अतिशय कष्ट घेतले होते आणि हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान लाभले.यावेळी मोठ्या संख्येने कुस्ती शौकिन हजर होते.