बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे : दौंड शहरात भिमनगरमध्ये अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गैरसोई होत असल्याने आज दिनांक: 02 रोजी नगरपालिका दौंड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) दौंड शहर अध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे यांनी दौंड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली . भिमनगर दलित वस्ती परिसरातील पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे.काही ठराविक भागात ईतर ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा होत आहे. आणि भिमनगरमध्ये मात्र रात्री अपरात्री कमी दाबाने पाणी सुटते ते पण 15 मिनिटात बंद होते रात्रभर जागरण करून देखील जिवनावश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी या पुरोगामी महाराष्ट्रामधील जनतेला अर्ज द्यावे लागतात हिच खरी शोकांतिका आहे . भिमनगरमध्येच अनेक वर्षापासून दुजाभाव का होत आहे. असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . तसेच पिण्याच्या पाण्याची सोय जास्तीच्या दाबाने करण्यात यावी व अनेक वर्षापासून जाम झालेले गटरचारीच्या चेंबरची दुरुस्ती लवकरात लवरकर करण्यात यावी अशी मागणी केली आहे.तसे निवेदन त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष टेंगले यांना दिले आहे.या संदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी यांना संपर्क केला असता ते म्हणाले की नागरिकांची मागणी रास्त आहे परंतु लगेचच तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल परंतु त्यांच्या मागण्या पुर्ण केल्या जातील. यावेळी सागर भाऊ जगताप. हर्ष सोनवणे. सुमित भाऊ सोनवणे. धनंजय सोनवणे. दत्ताभाऊ सोनवणे. मयूर सोनवणे. मिलिंद यादव. रुपेश बंड. अमर जोगदंड. व भिमनगर परिसरातील रहिवासी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्ये उपस्थित होते.


