कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी आर्य वैश्य समाजाची कुलदैवत श्री कन्यका परमेश्वरी वासवी माता जयंती सर्व समाज बंधू भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात आर्य वैश्य वासवी योगा भवनामध्ये वासवी मातेच्या कुमकुम पूजनानी करण्यात आली. सौ सीमा व अजय पापीनवार सौ गायत्री व गिरीश डुबेवार ,सौ स्वाती व डॉ सुधीर पापीनवार यांनी सपत्नीक मंत्रोच्चारामध्ये वासवी मातेचे पूजन केले. त्यानंतर 108 गोत्रांच्या उच्चारांमध्ये उपस्थित सर्व समाज बंधू भगिनींनी मातेचे कुमकुम पूजन केले. त्यानंतर आर्य वैश्य वासवी भवन उभारण्यात प्रशासकीय कामात ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते नगर परिषद पुसदचे अभियंता गिरीश डुबेवार यांचा उपस्थित जेष्ठ समाज बांधवांनी सत्कार केला तसेच वासवीरत्न पुरस्कार प्राप्त सौ ज्योती अमित बोजेवार यांचाही सत्कार करण्यात आला. मातेच्या आरतीने कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी समाज बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यानंतर श्री कन्यका परमेश्वरी वासवी माता चौक येथे जयंतीचे औचित्य साधून नव्याने निर्मित चौकामध्ये वासवी मातेचे पूजन करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष एडवोकेट उमाकांत पापिनवार कार्याध्यक्ष सुरज डुबेवार स्वागत अध्यक्ष दीपक आसेगावकर सचिव मनिष अनंतवार कोषाध्यक्ष प्रवीर व्यवहारे यांच्या हस्ते सपत्नीक मातेचे व चौकाच्या नामकरणाच्या पाटिचे पूजन करण्यात आले . त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित समाजाचे सर्व माजी अध्यक्ष तथा समाजाचे सर्व माजी नगरसेवक यांचे शुभहस्ते पूजन करून मातेचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर व्यापारी योग भवन पुसद येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच समाज उपयोगी अनेक शिबिरांचेही आयोजन जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले होते यामध्ये रक्त तपासणी शिबिर यामध्ये जवळपास 160 पुरुष व महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. याशिवाय आधार कार्ड व्हॅलीडेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्येही अनेक समाज बांधवांनी स्वतःच्या आधार कार्ड चे व्हलीडेशन करून घेतले, सोबतच राशन कार्ड अपडेट करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले याशिवाय समाजातील गरजवंत बांधवांना घरकुल योजनेची माहिती व्हावी त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचे मार्गदर्शन करण्यात आले. वासवी जयंतीचे औचित्य साधून समाजातील ज्येष्ठ माजी अध्यक्ष विनोद जिल्हेवार अभय गडम तसेच प्रा. संजय वटटमवार अनिल तगलपल्लेवार प्रवीर व्यवहारे अनिल डुबेवार यांची AVS हेल्पलाइन या संघटनेत निवड करण्यात आली समाजातील कौटुंबिक समस्या समाज स्तरावर सोडवण्यासाठी ही एव्हीएस हेल्पलाइन संघटना मदत करणार आहे. समाज उपयोगी असे विविध कार्यक्रम राबविण्यात आल्यामुळे समाज बांधवांनी त्याचा लाभ घेतला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी समाज बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकारणी सदस्य,आर्य वैश्य समाज महिला मंडळ आणि युवा जल्लोष च्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.