सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले : राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार अकोले येथील जेष्ठ विधिज्ञ मंगलाताई हांडे यांना जाहीर झाला असून त्यांना १ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड ग्राऊंड येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्याचे महसूल,पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या समारंभात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हयातील स्वांतत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सलग २५ वर्षे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेविकाना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. गेली ५ वर्षे हे पुरस्कार जाहीर झाले नव्हते.दि.३ मार्च रोजी महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील पुरस्कार जाहीर झाले असून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ऍड हांडे यांचा जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी समावेश आहे.या पुरस्काराचे स्वरूप असे होते. ऍड हांडे यांनी आदिवासी भागातील महिलांसाठी अनेक कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे घेतली असून त्यांनी अकोले तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सुरू केली आहे ,त्या माध्यमातून अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केलेले आहे.त्या महिला पतसंसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असून त्या आजतागायत अध्यक्ष आहेत. अनेक कॉलेज,शाळा मधून त्यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन , महिला बचत गट मार्गदर्शन व महिला सक्षमीकरण करण्याचे काम केले आहे . त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जिल्ह्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.