नागसेन अंभोरे
बाळापूर तालुका प्रतिनिधी
अकोला : बाळापूर तालुक्यातील देगांव जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निर्मलाताई रमेश अंभोरे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी देगांव ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच अनेक स्तरावरून त्यांचे कौतुक करण्यात आले. देगांव येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजानिक वाचनालयात अध्यक्षांचा सत्कार देखील करण्यात आला. मानवी जीवनाच्या प्रगतीचे माध्यम म्हणजेच शिक्षण आहे. आपल्या पाल्याला शिक्षण देणे हे आपले आद्य कर्तव्य असले पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना उद्भवणाऱ्या समस्या आणि शाळा विकासाच्या नवीन संकल्पना त्या रबवतील अशी आशा व्यक्त करण्यात आली. निर्मलाताई रमेश अंभोरे यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हे जबाबदारी पूर्वक पद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.











