कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार एकनाथराव काळबांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.सविस्तर वृत्त असे की पुसद तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचा 63 वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. दिनांक 1 मे 2023 रोजी पुसद तहसील कार्यालय येथील प्रांगणात पुसद येथील उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार एकनाथराव काळबांडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रध्वजाला सलामी देऊन जय जय महाराष्ट्र माझा गीताचे सामूहिक वाचन करण्यात आले. या शासकीय कार्यक्रमाला पुसद उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन् एस.पोलीस उपविभागीय अधिकारी पंकज अतुलकर नगरपरिषद पुसदचे मुख्याधिकारी किरण सुकलवाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड गट शिक्षणाधिकारी संजय कांबळे नायब तहसीलदार जी एन कदम नायब तहसीलदार इंगोले नायब तहसीलदार शेख साहेब पुसद शहर चे ठाणेदार शंकर पांचाळ इत्यादीं सह राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार सामाजिक कार्यकर्ता इत्यादींच्या उपस्थितीमध्ये हा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर असून या राज्याची उत्तरो उत्तर अशीच प्रगती होवो अशा शुभेच्छा समस्त नागरिकांना तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी एकनाथराव काळबांडे यांनी, दिल्या. या कार्यक्रमाला सदबाराव मोहटे बि जी राठोड सुरेश धनवे दीपक आसेगावकर देशोन्नतीचे पत्रकार दीपक महाडिक रिपब्लिकन वारताचे उपसंपादक राजेश ढोले इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष अनंतवार यांनी तर आभार नायब तहसीलदार जी एन कदम यांनी केले.


