शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : मागील पाच वर्षापासून मराठा युवा मंच प्रणित मराठा क्रांती भवन बांधण्यासाठी उमरखेड तालुक्यातील गरीब व होतकरू कुणबी मराठा विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची सोय व्हावी तसेच शिक्षण घेतांनी राहण्याची सोय व्हावी या उद्द।त हेतूने मराठा युवा मंचाने जागा घेऊन त्या ठिकाणी त्या जागेवर मराठा क्रांती भवन तसेच वस्तीगृहाची स्थापना करण्याचे ठरवले आहे त्यासाठी मराठा कुणबी समाजातील सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसवले आहेत. ज्या समाजात आपण जन्मलो आपला सर्वागीण विकास झाला त्या समाजासाठी आपल्याला काही तरी देणे लागते या उदात्त हेतूने उच्च विद्याविभूषीत्त डॉ .विजयराव माने यांच्याकडून मराठा क्रांती भवन बांधण्यासाठी व जागेच्या उपलब्धतेसाठी अडीच लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे मराठा युवा मंच प्रणित राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या 14 मे ला होणाऱ्या जयंतीनिमित्त पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर देवानंद माळी सांगली हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे आहेत त्याच कार्यक्रमात डॉ . विजयराव माने हे मराठा क्रांती भवन बांधण्यासाठी देणगी देणार आहेत . त्यांच्या या कार्यामुळे समाजातून युवक शेतकरी कष्टकरी वर्गातून व त्यांच्या मुला मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या उद्दत हेतूने मराठा क्रांती भवन व मराठा वस्तीगृहासाठी राजर्षी शाहू महाराज यांचा आदर्श घेऊन व लोकनेते भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठा भवन बांधून मराठा कुणबी समाजातील तरुण-तरुणी मोठमोठ्या पदावर जाऊन समाजाचा विकास व्हावा या उदात्त हेतूने त्यांनी मराठा क्रांती भवनासाठी अडीच लाख रुपयांची देणगी दिलेली आहे . लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने यांचे सामाजिक, राजकीय शैक्षाणिक कार्य खुप मोठे असुन त्या काळात भाऊसाहेब माने यांनी बहुजन समाजातील मुल मुली शिकावे यासाठी ग्रामिण भागात लोकांच्या दारात जाऊन लोकवर्गणीतुन श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन शाळे सोबत च विद्यार्थ्यानां राहण्यासाठी वस्तीगृहाची स्थापना चातारी , ब्राम्हणगांव , मुळावा, पोफाळी इत्यादी ठिकाणी केल्यामुळे तालुक्यातील खुप मोठे अधिकारी तयार झाले आहेच त्यांचेच नातु डॉ . विजयराव माने हे त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी संवेदनशीलतेने काम कात आहेत लोकनेते भाऊसाहेब माने यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रीया होऊन त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी आपला जिन प्रेस ची स्थापना करन त्यांनी शेतकऱ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कार्य केले .अशाच प्रकारे समाजातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, उद्योजक समोर येऊन मराठा भवनासाठी भरभरून मदत करतील अशी आशा मराठा युवा मंच ने व्यक्त केली आहे.











