फिरोज सय्यद
तालुका प्रतनिधी जामखेड
जामखेड : दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल १५१ युवकांनी रक्तदान केले. या शिबीराचे आयोजक जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत, निरपेक्ष भावनेने 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पुढाकारातून अपर्णा रक्तकेंद्र व जनकल्याण रक्तपेढी यांच्या सहकार्याने जामखेड पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी अजय साळवे, ॲड. अरूण जाधव, शामीर सय्यद, विकी सदाफुले, विनायक राऊत, बापुसाहेब गायकवाड अनिल बाबर आदिसह तालुक्यातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी संपूर्ण तालुक्यातून रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व २५ पोलीस बांधवासह , १५१ नागरिकांनी रक्तदान केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल संदिप आजबे, न्यु अपर्ण व्हॉलंटरी रक्तकेंद्राचे भाग्यश्री पवार, सुधीर माले, सुप्रिया कांबळे, जनकल्याण रक्तपेढीचे शरद बळे यांनी खास परीश्रम घेतला.


