कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : नप अंतर्गत प्रभाग क्र.15 जुना 14 मधील जाधव ले आउट समोर गिरीराज पार्क मधील सुमारे 30000 स्के. फूट चा ओपन स्पेस मराठा समाज योगा भवनासाठी देण्यात आला होता. सदर जागेवर योगा भवन बांधकामासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 2 कोटी रु चा निधी मंजुर झाल्याची माहिती पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी दि.27 फेब्रुवारी रोजी पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.सदरच्या निधी उपलब्धीसाठी मैंद यांनी मराठा समाज बांधवांतर्फे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. भावना गवळी यांचे विशेष आभार मानले.पुसद न .प अंतर्गत खुल्या जागेवर मराठा समाजाचे योगा भवना साठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून जेष्ठ नेते माजी मंत्री मनोहरराव नाईक तसेच आ. ऍड. इंद्रनिल नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मैंद यांनी यावेळी आवर्जून सांगितले. पुसद शहरातील नप अंतर्गत गिरीराज पार्कस्थित जागेवर मराठा समाज योगा भवन निर्माण करण्याचे हेतूने पत्र नप ला देण्यात आले होते. ही जागा मिळवून देण्यासाठी पुसद न प चे मुख्यधिकारी डॉ किरण सुकलवाड, अभियंता गिरीश डुबेवार यांनीही मोलाचे सहकार्य केले. जागा उपलब्ध झाल्यानंतर सर्वांसाठी उत्कृष्ट असे योगा भवनाची निर्मिती व्हावी या हेतूने मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ.ऍड. इंद्रनिल नाईक यांच्या प्रयत्नाने 1कोटी रु चा निधी उपलब्ध झाला होता. मात्र मागील काळात झालेल्या राजकीय घडामोडी नंतर म. वि.आ. काळातील कामांना स्थगिती मिळाल्याने तो निधी प्रत्यक्ष मिळू शकला नाही. दरम्यान पुसद येथे भारती मैंद पतसंस्था तर्फे आयोजित दुर्गादेवी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी आलेल्या खा. भावना गवळी यांना शरद मैंद यांनी मराठा समाज योगा भवन साठी 2कोटी रु. चा निधी उपलब्ध व्हावा असे विनंती पत्र दिले होते. त्याचं पत्राची दखल घेत खा. भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे शिफारस केली. नुकतेच 2कोटी रु चा निधी पुसद च्या मराठा योगा भवनासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन मंजूर झाल्याचे आदेश नगर विकास विभागाने 21फेब्रुबारी 2023 रोजी काढले आहेत.लवकरच या कामाला सुरवात होईल अशी अपेक्षा यावेळी शरद मैंद यांनी व्यक्त केली. याच योगा भवनामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी करिता स्टडी सर्कलची निर्मिती करण्यात येईल व ते सर्व समाजाच्या विध्यार्थ्यांसाठी सदोदित खुले राहील अशी माहिती मैंद यांनी दिली. सदर भवन ‘मराठा योगा भवन’ नावाने असले तरी सर्व समाजातील नागरिकाना आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी ते उपलब्ध राहील असेही यावेळी शरद मैंद यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले.आयोजित पत्रकार परिषदेस महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय बार कौन्सिलचे सदस्य ऍड. आशिष देशमुख ऍड माधवराव माने अनिरुद्ध पाटील चोंढीकर जीपचे माजी बांधकाम सभापती राम देवसरकर शिवसेना नेते राजन मुखरे पंजाबराव खडकेकर देशमुख अशोक बाबर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर ऍड रमेश पाटील,साहेबराव ठेंगे शरद पाटील नीलकंठ पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख ऍड.उमाकांत पापीनवार ऍड.तुषार देशमुख, नाना जळगांवकर दीपक जाधव,ऍड.भारत जाधव राजू साळुंखे प्रा. कृष्णा कडस्कर चंद्रकांत ठेंगे प्रा. अजय क्षिरसागर सुधाकर ठाकरे सर भारत पाटील किशोर पानपट्टे सुशांत महल्ले सुरोशे सर,भगवान असोले नितीन पवार सुधिर देशमुख, यशवंतराव चौधरी, सुभाष चव्हाण राजू दळवी अनिल चव्हाण,किरण देशमुख अभिजित पानपट्टे करण ढेकळे प्रभाकर टेटर प्रकाश भोसले ऍड.महेश निर्मल ऍड.विनोद पाटील किशोर पानपट्टे संदीप चौधरी सचिन भीताडे प्रा. प्रकाश लामने कैलास जगताप दीपक महाडिक,पंजाबराव सुरोशे यशवंतराव सुरोशे संग्राम देशमुख प्रतिक चव्हाण धिरज पानपट्टे मनोज पानपट्टे सुरेश चौधरी संजय पाटील चव्हाण दीपक देशमुख गिरीश डांगे,विशाल दुधाने अनिकेत पाटील सुधाकर वशिमकर अमोल व्हडगिरे अभिषेक पवार,आदीजण प्रामुख्याने उपस्थित होते.