अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : दि – 28 फेब्रुवारी 2023 राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिनाचे औचित्य साधून प्रा. डॉ. दिनेश सुर्यवंशी (नरसम्मा हिरय्या कॉलेज अमरावती) यांच्या गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अमृता शिरभाते यांनी भूषविले.सूर्यवंशी सरांचे स्वागत डॉ.अमृता शिरभाते यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले.प्रा.डॉ.दिनेश सूर्यवंशी यांनी माजी कुलगुरु डॉ.दिलीप मालखेडे यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार व भौतिकशास्त्रातील विविध करियर संधी या विषयी मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी विविध शोध व संशोधक तसेच डॉ. मालखेडे यांनी मौलिक कार्य या विषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच अभार प्रदर्शन प्रा.गोविंद भालेराव (भौतिकशास्त्र विभाग प्रमुख) यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पंढरी अंभोरे यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शविली तसेच कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.