सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : तालुक्यातील विडुळ ग्रामपंचायत मधील वांगी येथे दि 28 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शुल्लक कारणावरून सख्या भावानेच मोठ्या भावाला साळी कुटण्याच्या लाकडी दांड्यांने मारल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वांगी येथे घडली सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे . प्राप्त माहितीनुसार मूर्तक गणेश माधव हातमोडे वय 45 वर्ष रा वांगी यांची मानसिक संतुलन ठीक नसल्याचे सांगण्यात येते (मतीमंद ) सतत वादीवाद करत असे आज दि.28 फेब्रुवारी रोजी मृतक गणेश व आरोपी बालाजी यांच्यात शुल्लक कारणावरून वाद घातल्याने दोघांच्या हातापायी मध्ये मृतक गणेश याच्या डोक्यावर हातावर कमरेवर जीव घेणे घाव लागल्याने तो जागीच गतप्राण झाला बालाजी माधव हातमोडे रा वांगी वय 40 वर्षे याने रागाच्या भरात येऊन सख्ख्या भावालाच लाकडी दांड्या ने मारून जागीच ठार केले व मूर्तकाचे पार्थिव शरीर अंगणात खड्डा करून विल्हेवाट लावण्याची प्रयत्न सुरू असतानाच गावकऱ्यांच्या लक्षात आले असता गावातील पोलीस पाटील गजानन मुलंगे यांनी सदर घटनेचा हाकिकत उमरखेड पोलीस स्टेशन येथे भ्रमणध्वनीद्वारे सांगण्यात आले त्याच क्षणी पोलिसांचा ताफा तालुक्यातील वांगी येथे पोहोचला व मारेकरी बालाजी माधव हातमोडे यांना उमरखेड पोलीस स्टेशन येथे अटक करून आणण्यात आले . व मृतकाचे पार्थिव शरीर शवविच्छेदनासाठी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले असुन शवविच्छेदन प्रक्रिया उद्या होणार आसुन ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास पी एस आय सी एम चौधरी , पो अ राजू पवार, मिराशे, वंजारी यांची टीम करीत आहेत.