कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी, पुसद
पुसद : किशोरवयीन मुला- मुलीना मोबाईल बंदी या स्तुत्यपूर्ण उपक्रमाबद्दल सरपंच गजानन टाले यांचा सत्कार नगरपालिका पुसद येथील विविध योजनेच्या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे दि.१० जानेवारी २०२३ रोजी आले असता त्यांनी तालुक्यातील मौजे बान्सी येथे भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिके एन. एस., तहसिलदार एकनाथ काळबांडे, गटविकास अधिकारी संजय राठोड, विस्तार अधिकारी के .पी. सोनटक्के, व इतर अधिकारी वर्ग यांनी गावातील ४२एकरवरील रेशीम ऊद्योगाची पाहणी केली. गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी रेशीम शेती करतात. त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी , समस्या त्यांनी जाणुन घेतल्या व नरेगा च्या कामासाठी येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेला भेट दिली व विद्यार्थांसोबत संवाद साधला तसेच ग्रामपंचायती घेतलेल्या किशोरवयीन मुला-मुली करिता मोबाईल बंदी निर्णयाचे स्वागत करुन सरपंच गजानन टाले यांचा पुष्पगुच्छ व शाल सत्कार केला.
यावेळी सरपंच गजानन टाले यांनी गावातील समस्या जिल्हाधिकारी अमोल येगडे यांच्या समोर मांडल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक ॲड. रमेश पाटील, बाळासाहेब देशमुख ,माधव मळघणे, देविदास देशमुख ,सचिव पी .आर. आडे,तलाठी एस.बि.ढगे, कृषी सहाय्यक बि.एस.भिसे, उ. प्रा.मराठी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत देशमुख, ज. शि .प्र मं. विद्यालयाचे मुख्याध्यापक पि.डि.ढाकरे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.