गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी, मंठा
मंठा : तालुक्यातील केहाळ वडगाव येथील संत बाळूमामा मंदिरात परमात्मा पांडुरंग व संत बाळूमामा यांच्या प्राणप्रतिष्ठा मूर्ती स्थापना सोहळा 11 जानेवारी बुधवारी उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाला.श्री संत बाळूमामा मंदिरात मंगळवार दि. 10 जानेवारी रोजी यज्ञयाग व होमहवन धार्मिक सोहळा संपन्न झाला. तसेच सोमवार 11 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता प्राणप्रतिष्ठा मूर्ती स्थापन सोहळा श्री महंत बालकगिरीजी महाराज यांच्या हस्ते सपन्न झाला व त्यानंतर ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे राहिणेकर यांचे कीर्तन झाले. महाराजाणी बोलताने देव आणि संतांचे महत्व सांगितले, गायनाची साथ सोपानकाका पेवेकर, ज्ञानेश्वर माऊली वायसे, अंगद महाराज यांनी केली तर मृदंग वादक कैलास महाराज भुसारे होते. त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला वेदाचार्य प्रमोदगुरु चारठाणा , धोंडूगुरू चारठाणा,अशोकगुरु,श्रीपादगुरु शिवाजी महाराज चारठाणकर व सहकारी आचार्य म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी पंचक्रोशितील नायगाव, देवगाव, तळेगाव, जयपूर काकडे, पेवा,आनंदवाडी,सोनुनकरवाडी, पांढुर्णा, माळेगाव भजनी मंडळ व भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.या धार्मिक सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे आमदार बबनराव लोणीकर साहेब उपस्थित होते. त्यांनी बाळूमामा संस्थानाला रस्त्यासाठी पाच लाख निधी देऊन धार्मिक कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेशराव खवणे भाजपा किसान मोर्च्याचे नेते तथा बाजार समिती उपसभापती राजेश मोरे,शेषनारायण दवणे नगरसेवक,शिवसेनेचे अशोक मुरकुटे, रामेश्वर शिंदे, रामदास देशमुख,दिगंबरअप्पा दराडे, बळीराम खंदारे, पानसंबाळ साहेब, भारत कव्हळे,महादेव घुगे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी छत्रपती शिवराय मित्र मंडळ गावकरी तसेच परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी व भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.