चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी, अकोट
अकोट : बाजार समितीमध्ये होऊ घातलेल्या निवडणूकांच्या अनुषंगाने बैठका, मेळावे आणि भोजनावळींचे सत्र सुरु झाले असून या सत्राच्या सलामीलाच शेतकरी पॅनलने दिलेल्या स्नेहभोजनानंतर सहकार पॅनलचा मेळावा पार पडला. आता कास्तकार पॅनलने भोजनावळीसह घेतलेल्या मेळाव्यात बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग फूंकले आहे.स्थानिक अग्रसेन भवन येथे या अनुषंगाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परिसरातील मान्यवर मंडळी व बहुसंख्य ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी अतुल म्हैसने यांनी आपल्या प्रास्ताविकातून ‘अचूक नियोजनाला कठोर प्रयत्नांची जोड दिल्यास विजयाला पर्यायच नाही.’ असे सांगितले. सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्या अधोगतीला सत्तेत असणा-या सहकार पॅनलचे ढिसाळ नियोजनच कारणीभूत आहे. असे प्रभाकरराव मानकर यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले. याप्रसंगी निखिल गावंडे, जगनराव निचळ, देविदास म्हैसने, राजकुमार मंगळे, काशिराम साबळे, मनोहर शेळके, केशवराव मेतकर, सुरेशदादा खोटरे यांची समायोचित भाषणे झालित. एकंदरीत सहकार क्षेत्रातील सर्व निवडणूका कास्तकार पॅनलच्या माध्यमातून एकजुटीने व नव्या जोमाने लढविण्याचे ठरविले. कार्यक्रमाला देविदास म्हैसने, दिनकरराव जायले, अरुणभाऊ फसाले, बाळसाहेब बोंद्रे, राजूभाऊ शेंडे, राजू भालतीलक, सुभाष डिक्कर,डाॅ. ज्ञानेश्वर मानकर, गजानन मालठाणे, शंकरराव साबळे, अरुण गावंडे, गोपाल नहाटे, शरद नहाटे, दिनकर राऊत, मधुकर कडू, विलास साबळे, संजय मानकर, ज्ञानेश्वर ढोले, प्रभाकर वाघमारे, संदिप कुलट, सुभाष म्हैसने, हरिभाऊ वाघोडे, संजय पुंडकर, घनशाम रेळे, राजेंद्र थारकर, अनंत गावंडे, विश्वासराव गावंडे, नरेंद्र वानखडे, पिंटू वडतकार, जयदेवराव साबळे, बाळासाहेब मंगळे अविनाश गावंडे, पांडूरंग वालसिंगे, सारंगधर वालसिंगे, श्रीकृष्ण वालसिंगे, सागर ढोके, दादाराव पेटे, अय्याज अली, कालेखां पठाण, दत्तात्रय चौधरी, डॉ. शिवदास बूटे, निलकंठ मेतकर, तुषार पाचपोर, विलास ठाकरे, रामकृष्ण भगत, राजकुमार खंडेराय, सुनिल वडाळ, डॉ. गायकवाड, माधवराव डिक्कर, विनायक इंदोरे, राजू शेळके, विलास मोहोकार, किशोर अवारे, गोपाल रावणकार, विलास हिंगणकर, घनशाम कडू, संजय रावणकार, रघुनाथ भगत, अरुण काकड, गजानन गावंडे, पुंडलिक बोरोकार, राजू धुंदे, अॅड. सुशिल खवले, राजू येवूल, विलास मेंढे, डोबाळे यासह तालुक्यातील शेकडो कास्तकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रा. विश्वासराव वसू तर आभार प्रदर्शन मेळव्याचे आयोजक अतुल म्हैसने यांनी केले.