सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : तालुक्यातील सुकळी (जहागीर ) येथे ग्रामस्थांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणात मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे गावकऱ्यांच्या हस्ते पूजन करून राजमाता जिजाऊ प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी अनेकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास सुकळी (जहागीर ) गावचे सरपंच शिवाजीराव रावते, नागेश वानखेडे, विष्णू वानखेडे, राहुल दशरथ वानखेडे, भगवानराव रावते, राजू वानखेडे, गजानन वानखेडे, रामेश्वर वानखेडे, सुरज कदम, अक्षय वानखेडे शिवाजी मारुती वानखेडे, योगेश वानखेडे तुकाराम रामराव वानखेडे, सुमित संजय वानखेडे, दत्तराव कदम यांची उपस्थिती होती.


