सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : उमरखेड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रथमच एक महिला अध्यक्ष म्हणून मा. पंचायत समिती.सदस्या श्रीमती संगीता दशरथराव वानखेडे यांची निवड तालुक्यातील सर्व 139 स्वस्त धान्य दुकानदार यांनी हा हरदडा.येथील बैठकीत सर्वानुमते केली त्याप्रसंगी निवडीनंतर अध्यक्ष संगीताताईनी सर्वांचे आभार मानले व मिळालेल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुक्यातील सर्व दुकानदार उपस्थित होते.