सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : 1 जानेवारी 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भारतीय बुद्ध महासभा शाखा उमरखेड व समता सैनिक दल शाखा उमरखेड च्या वतीने आज सकाळी ठीक 8.30 वाजता भीमाशौर्यदिनानिमित्त मानववंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी सदर मानवं वंदेनेसाठी सेवानिवृत्त माजी सैनिक राजेसाहेब पंडित मेजर पाईकराव विनोदबरर्डे साळवे पिळवंट.इत्यादी माझी सैनिकांच्या वतीने पुतळा परिसरात भीमा शौर्य स्तंभाला प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी समता सैनिक दलाची हदगाव येथील टीम व महिला समता सैनिक दल शाखा महागाव व समता सैनिक दल उमरखेड यांनी भीमा शौर्यस्तं भास. पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली त्यापूर्वी यशवंत काळबांडे. धम्मानंद काळबांडे संभाजी मुनेश्वर अँड. शंकर मुनेश्वर अँड. पंजाबराव नवसागरे बडेराव, उद्धव गायकवाड, सतीश कोल्हे,सारनाथ रोकडे, सिद्धार्थब रर्डे सुरेशदवणे दत्तासिंगारे.यांचे हस्ते पंचशील ध्वजारोहण करून पंचशीलाचे ग्रहण करण्यात आले यावेळी सर्वांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या, पुतळ्याला माल्या अर्पण करण्यात आली, यावेळी संभाजी मुनेश्वर सर धम्मानंद काळबांडे अँड. शंकर मुनेश्वर यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी उद्धव गायकवाड यांनी करणी सेनेच्या मोरक्या.सेगर.यांचा निषेध व्यक्त केला सूत्रसंचलन यशवंत काळबांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उद्धव.गायकवाड यांनी केले