चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी, अकोट
अकोट : श्याम मित्र मंडळ परिवार अकोट तर्फे 02 जानेवारी 2023 सोमवार ,पौष शुक्ल एकादशी निमित्त रामदेवबाबा मंदिर, प्रांगण अंबिका नगर, अकोट येथे श्री.बाबा श्यामजी भजन ब कीर्तन चे भव्य आयोजन करण्यात आले होते.यात बाबा चा अद्भुत श्रृंगार, बाबा ची दिव्य ज्योत, बाबा चे सुमधुर कीर्तन संपन्न झाले.सायं 7 ते 10 वाजेपर्यंत चाललेल्या या भजन संधेत बाबा भक्तांनी खाटू नरेश भजनावर थीरकण्याचा आनंद घेतला.अकोट शहरातील रामदेव बाबा मंदिर येथील भव्य प्रांगणात आयोजित भजन संधेत विदर्भातील सुप्रसिद्ध भजन गायक चंद्रकांत जी तिवारी त्यांच्या सुमधुर वाणीतून श्री खाटू श्याम भजनाने मंत्रमुग्ध होऊन आपण राजस्थान येथील खाटू नगरीत पोहोचल्याचे भक्तगणांना वाटत होते. सदरहू भजन संधेत दर्जी सील दे निसान मने खाटू जानू से , पलको का घर तयार सावरे ,विठ्ठल विठ्ठल विठ्ठला , खम्मा खम्मा, आदि चंद्रकांत तिवारी यांच्या स्वरचित भजनांवर भक्तगणांनी थिरकण्याचा आनंद लुटला. शेकडों भक्तगणांच्या उपस्थितीत प्रथमताच आकोट नगरीत एवढ्या भव्य प्रमाणात श्री खाटू श्याम बाबा भजन संध्या संपन्न झाल्याचे चित्र निदर्शनास आले. भजन संध्या चा समारोप श्री खाटू श्याम बाबा च्या आरतीने करण्यात आला.भजन संधेत अकोट येथील भक्त गणांसोबतच हिवरखेड व आडगाव येथील भक्तगणांची शेकडोच्या संख्येत उपस्थिती लाभली.


