गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी मंठा
मंठा : तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने असलेल्या तळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार हा रामभरोसे आहे दोन मेडिकल अधिकारी 15 कर्मचारी आरोग्य विषय समस्याची संपूर्ण जबाबदारी असताना सुद्धा आज प्रत्यक्ष पाहणी सातच कर्मचारी उपस्थित असल्याने निर्देशनास आले यामध्ये यु एल कुटे मनिषा घनसावत संदिप गहीलोद आदेश घुले स्वाती सुरवसे नवनाथ सपाटे सचिन डोंगरे हे कर्मचारी वेळेत उपस्थित आढळून आले तर दोन वैद्यकीय अधिकारी असलेल्या केंद्रात वेळेच्या आत दोनही वैदिक अधिकारी गैरहजर दिसून आले एका कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी एम आर चव्हाण यांना संपर्क करून बोलून घेतले तळणी ग्रामस्थ ज्ञानेश्वर राठोड यांनी जिल्हाधिकार्यालय दिलेल्या निवेदनात सांगितले की तळणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसुन रुग्नाची हेळसांड होती ग्रामस्थ राठोड यांनी स्वतः आरोग्य केंद्राची पाहणी केली असता उपस्थित पटावरील 17 कर्मचार्यां पैकी 5 कर्मचारी उपस्थित होते तळणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत दहा ते पंधरा गावे येत असुन गरिब गरजु उपचारासाठी येत असतात याकडे याकडे तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे साफ दुर्लक्ष होत आहे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर शासनाचा लाखो रुपयाचा वरचा वैद्यकीय अधिकारीच्या दुर्लक्षामुळे पडून आहे तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोणा काळातील लाखो रुपयांची औषधी तळणी आरोग्य केंद्रात धुळखात पडुन आहे. गैरहजर कर्मचारी एम के ढाकणे वैद्यकीय अधिकारी, के एस पालवे(रजेचा अर्ज) पी के शेवाळे ( रजेचा अर्ज ), जे एस सरकटे , एस एन सानप, के पी सानप शासनाच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर लाखो रुपयाचा निधी उपलब्ध असताना सुद्धा कर्मचारी शासनाकडून मिळालेल्या सुविधा औषधी गरजु रुग्ना पर्यंत पोहोचण्यात चालढकल पणा करत आहे तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रात लाखो रुपयांची औषधी पडुन आहे ती औषधी कालबाह्य झाली असुन जबाबदार कर्मचारयावर कार्यवाही करावी या साठी जिल्हाधिकार्याना निवेदन दिले असल्याने ग्रामस्थ ज्ञानेश्वर राठोड यांनी सांगितले.



