चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे त्रेचाळीस हजार सातशे त्रेचाळीस शेतकरी बाधित झाले असून ३९ हजार ३२९ हेक्टर क्षेत्र बाधित क्षेत्र आहे. त्यात ३३२६८ जिरायत पिकाचे ३४१ हेक्टर बागायत पिकाचे व ५८३७ हेक्टर फळबाग पिकाचे क्षेत्र बाधित झाले आहे व ६६कोटी ७८लाख 44हजार सातशे चौरायांशी रुपयाच्या निधीची अपेक्षा शासनाकडून होती. तसेच ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे सतराहजार शेतकरी बाधित झाले असून त्यात जिरायत पिकाचे ७६२५हेक्टर बागायत पिकाचे ४४हेक्टर फळबाग पिकाचे १२२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून खरडून गेलेली २४६ हेक्टर जमीन आहे व त्यापुढे त्यापोटी अकरा कोटी ८५ लाख २१हजार ९४४रुपयांचा निधी असा एकंदरीत ७८कोटी ६३लाख ६६ हजार ६७८ रुपयांची रुपयांचा निधी शासनाकडून अपेक्षित असल्याचा अहवाल तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी व महसूल विभागाने संयुक्तपणे पाठविला असून शासनाकडून फक्त उमरा मंडळातील १४२८शेतकरी व एक हजार अठरा एकर बाधित क्षेत्र बाधित गृहीत धरून फक्त दोन कोटी ८४लाख ५४हजार १००रुपयाची रुपयांचा निधी जाहीर करून जवळपास ५९००० शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांची क्रूर थट्टा केली आहे. ढगफुटी सदृश्य पावसाची सुरुवात ज्या भागातून सुरू झाली त्या भागाला एक रुपयाचा सुद्धा निधी जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे तिन्ही संबंधित विभागांनी पाठविलेला अहवाल झुगारून कोणत्या मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांचा अहवाल स्वीकारण्यात आला हे समजण्यास मार्ग नाही ही परिस्थिती फक्त अकोट तालुक्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याची आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकवटून जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करावा ही शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे.


