सय्यद रहीम रजा
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : जवळ असलेले सुकळी (जहागीर) राष्ट्रीय महामार्ग नागपूर तुळजापूर हायवे रोड जात असलेला सुकळी (जहागीर) येथील उडान पूल रखडलेले बांधकाम पूर्ण करा. सुकळी (जागीर) होऊन जात असलेला नागपूर तुळजापूर हवे रोडवर असलेला उडान पुलाचे रखडलेले बांधकाम मुळे गावातील नागरिकांना जीव मुठीत धरून ये -जा करावा लागतो. सुकळी येथील हवे रोडउडान फुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे संबंधित कंपनीच्या अर्धवट कामे केले. यामुळे उडान पुलाचे काम अर्धवट स्थितीत रखडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. उड्डान पूल नजीक अपघात होण्याची शक्यता आहे. नागपूर तुळजापूर महामार्गाला ठिकठिकाणी कामे तातडीने पूर्ण करावी राष्ट्रीय महामार्ग सुकळी( जहागीर) येथून गावातील जाणारे विद्यार्थी ज्ञानप्रकाश विद्यालय सुकळी (जहागीर )व जिल्हा परिषद उर्दू शाळा सुकळी (जहागीर ) शाळेतील मुलांना विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडी रखडलेल्या उडान पुलामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये -जा करावी लागते. सुकळी जागीर येथून जात असलेला नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपूल चे रखडलेले काम पूर्ण करा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.