मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन : तालुक्यातील बोर्लीपंचतन शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेनेचं नवं पक्षचिन्ह असलेली मशाल पंचक्रोशीतील जनतेपर्यंत पोहचावी या हेतूने बोर्लीपंचतन शिवसेना शाखेच्या वतीने गावातील मारुती नाका ते बस स्थानका दरम्यान धगधगती मशाल हाती घेऊन काढण्यात आलेल्या फेरीला जोरदार प्रतिसाद मिळाला.गेल्या अडीच महीन्याच्या सत्तासंघर्षानंतर निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवून अंधेरी पोटनिवडणूकीपुरते शिवसेनेला धगधगती मशाल चिन्ह मिळाल्यानंतर हे चिन्ह सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्रभरातील शिवसैनिक पेटून उठलेला असताना बोर्लीपंचतन पंचक्रोशीतील तमाम निष्ठावंत शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून येत्या प्रत्येक निवडणूकीसाठी तयार असल्याचे या मशाल फेरीद्वारे दाखवून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.बोर्लीपंचतन येथील शिवसेनेचे निष्ठावंत, निस्वार्थी व अभ्यासू माजी उपविभागप्रमुख मिलिंद जाधव यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की कोणत्याही घरातील कुटुंबप्रमुख जेव्हा अडचणीत येतो किंवा एखाद्या संघर्षाचा सामना करत असतो त्यावेळी सर्व कुटुंब त्याच्या पाठीशी उभं रहातं.त्यालाच अनुसरून आपले पक्षप्रमुख आज विश्वासघातकी राजकारणाला तोंड देत असताना आपण त्यांच्यासोबत आहोत हे दाखवून देण्याची वेळ आली आहे.हासूद्धा आपल्या हिंदुत्वाचा एक भाग आहे. सोबतच मुंबईत आपले कोणी नातेवाईक,मित्र किंवा आप्तस्वकीय असतील तर त्यांच्याजवळ संपर्क करुन अंधेरी पोटनिवडणूकीतल्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासाठी त्यांच्याकडून मतदान करुन घेण्याच आवाहन केलं.यावेळी श्रीवर्धन तालुकाप्रमुख अविनाश कोळंबेकर,उप तालुकाप्रमुख सचिन गुरव, एजाज हवालदार,मिना गाणेकर,शाखाप्रमुख गजू भाटकर,उपशाखाप्रमुख समिर दिवेकर,रीजवान मांडलेकर,अंजर पीरकर,श्रीवर्धन तालुका युवासेना अधिकारी संदेश म्हसकर,संतोष कांबळे, विभागप्रमुख रमेश कांबळे, मुंबई गटप्रमुख सुधाकर कांबळे,प्राची दुदूसकर,निवास गाणेकर,अनंत गुजर,सुनिल अडूळकर,कृष्णकांत पाटील, विजय कांबळे,मसुद दर्जी, किशोर तोडणकर,राजन तोडणकर,महेंद्र मोरे,तात्या वडके,अनंत मयेकर,अनिल पवार,कौशल वाणी,निलेश वाणी,गजानन चाळके,शंकर गाणेकर,नाना मोहीते योगेश धुमाळ गजानन कदम,शैलेश भाटकर इ.शिवसैनिक उपस्थित होते.