महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील मांगली (रै.) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूरज चौधरी यांच्या संकल्पनेतून मांगली (रै.) गावात नुकताच ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला. मांगली येथील कर्तव्यदक्ष सरपंच धनराज पायघन, ग्रामपंचायत आणि आपलं गणेश मंडळ यांच्या सहकार्याने गावातील नागरिकांकरिता ऑक्सिजन पार्क उभारण्यात आला असून नुकतेच तेथे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील ग्रामपंचायतीसमोर असलेल्या जवळपास एक हजार चौरस फूट जागेत आतापर्यंत शंभरच्या वर वृक्ष लावण्यात आली.मागील कोरोना काळात ऑक्सिजन अभावी नागरिकांना झालेला त्रास व वाढते प्रदुषण लक्षात घेता मांगली गावात नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कचा गावातील तसेच परिसरातील नागरिकांना भविष्यात फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑक्सिजन पार्क हे गावातील ग्रामपंचायत समिती तसेच गावातील युवकांच्या श्रमदानातून आणि स्वखर्चाने करण्यात आले असुन या ऑक्सिजन पार्क करीता विशेष सहकार्य उपसरपंच ज्योतिताई झिलपे, ग्रामसेवक धीरज रायपुरे, ग्रामपंचायत सदस्य भीमराव वानखेडे, भाविक गेडाम, हेमलताताई वानखेडे, गीताताई कोडापे, म.गां.तं.मु.स.सदस्य अरविंद वानखेडे, रवींद्र ढोबरे, स्वप्नील रंगारी, कुणाल झिलपे, सुनील गायकवाड, सत्यभान मत्ते, रवी वानखडे तसेच गावातील युवक मनोज उगे, महेश ढेंगळे, राहुल जेणेकर, शितम ढेंगळे, संकेत वानखेडे, सोमेश मेहरे, सूरज मडावी, वैभव जीवतोडे, साहिल झिलपे, प्रणित उताणे, नितीन कांबळे, नितीन चौधरी, वैभव उगे, तुषार सिडाम, अमित पथाडे यांच्यासह गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे सुध्दा योगदान लाभले.तालुक्यातील सर्व महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन प्रत्येक गावात ऑक्सिजन पार्क उभारावे असे आवाहनही सामाजिक कार्यकर्ते सूरज चौधरी यांनी केले आहे.


