कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : दरवर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात अग्रेसर असलेल्या चिंतामणी गणेश मंडळाने यावर्षी राष्ट्रीय दिव्यांग संघ यांचा बहारदार संगीतमय गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.मंडळाने दिलेल्या संधीचा फायदा घेऊन राष्ट्रीय दिव्यांग संघाने अतिशय उत्साह पूर्ण गीते गाऊन संपूर्ण श्रोत्यांची मने जिंकली. त्यातच एक कमी वयाचा यश गायकवाड यांनी सर्वप्रथम ‘मोरया मोरया’ हे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याच्या या गायनाने कार्यक्रमांमध्ये जो उत्साह निर्माण झाला तो कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत राहिला. त्यानंतर ‘ताशाचा आवाज तरर झाला’ ‘पार्वतीच्या बाळा’ अशी एक ना अनेक बहारदार गीते याठिकाणी मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय दिव्यांग संघाने सादर केली. अशा या पुसद तालुक्यातील काकडदाती येथील गोविंद नगर मध्ये मागील २३ वर्षापासून सतत गणपती उत्सव साजरा करण्यात येत असून दरवर्षी या मंडळाचा काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम चालू असतो. म्हणूनच संपूर्ण काकडदाती ती परिसरामध्ये चिंतामणी गणेश मंडळाचे नाव सदा अग्रेसर असते. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संपूर्ण चिंतामणी गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


