कु. चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : दिनांक ०१/०९/२०२२ रोजी वसुंधरा कॉन्व्हेंट येथे अकोट तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.तालुक्यातील शाळांनी याच्या सहभाग घेतला. वर्ग नऊ ते बाराच्या गटामधून राधाबाई गणगणे विद्यालयचे विद्यार्थी प्रथमेश साबळे व सुरज पुराळे यांनी फळ तोडणी यंत्र विज्ञान प्रदर्शन मध्ये सादर केले, त्यांचे महत्व व उपयोगिता विशद केली .परीक्षकांनी या यंत्राची उपयुक्तता लक्षात घेऊन प्रथम क्रमांक देऊन त्यांना गौरवान्वित केले. या उपकरणांसह विद्यार्थी राधाबाई गणगणे विद्यालयाचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करणार आहेत.या यशाचे श्रेय ते संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक सी.ए. आंबळकर व मार्गदर्शक शिक्षक व आई वडील यांना देतात.











