संजय पराडके
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार (तळोदा ) : एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने नगरपालिका तळोदा प्रशासन दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तळोदा शहरातील स्मारक चौक येथे आदिवासी वीर एकलव्य यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. तळोदा तालुका हा आदिवासी समाजाचा गड समजला जातो.तालुक्यात 90 टक्के आदिवासी समाज बांधवांची वस्ती आहे. अनादिकलापासून आदिवासीची एक वेगळी ओळख असून समाजात ऐतिहासिक कालखंडात होऊन गेलेले विर योद्धा व आद्य समाज सुधारकांच्या गाथा, माहिती व आदर्श येथील बांधवांना व्हावी आणि वर्तमानात आपल्या समाज बांधवांच्या उन्नतीसाठी कार्य करावे.यासाठी आदिवासीचा आद्य क्रांतिकारक, आदर्श व भगवान म्हणून पुजले जाणारे विर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवून त्यांची गुरुभक्ती ही आजच्या युवकांना प्रेरणा दायी असल्याने ती प्रेरणा कायम मिळत राहावी, यासाठी तळोदा शहरात भगवान एकलव्याचा पूर्णकुर्ती पुतळा बसवण्यात यावा, अशी समाजाच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या व आदिवासी समाज बांधवांच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल व याची जबाबदारी प्रशासन घेईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे शहर अध्यक्ष विनोद पाडवी, शहरउपाध्यक्ष अरविंद, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अँड गणपत पाडवी, संजू पाडवी सुरेश वळवी, धनराज पाडवी, सचिन नाईक, विनायक पालवे, ललित राजपूत, किशोर पाडवी आदी उपस्थित होते.