लोणी काळभोर : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. पोलिस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे आदींच्या हालचालींवर नजर ठेवून कठोर कारवाई करणेबाबतचा आदेश सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत. त्यानुसार सराईत गुन्हेगार अमित बालाजी सोनवणे (वय 26,रा. माळी मळा, लोणीकाळभोर, ता. हवेली), गणेश बाळू भोसले (वय 26, वर्षे रा. माळी मळा), करण ऊर्फ सत्या बाळू पांढरे (वय 22, रा. खंडोबाचा माळ, उरुळी देवाची, ता. हवेली) अशी स्थानबद्ध केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई आदींच्या मार्गदर्शनाखाली केली.