दिनेश शर्मा
शहर प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा : येथील भारत विद्यालय बुलढाणा येथे ३० ऑगस्ट रोजी मासिक पाळी स्वच्छता जनजागृतीवर वर्ग सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत लाइट प्रोजेक्टरवर स्लाईड शो द्वारा व सोप्या भाषेत शरीरातील होणारे बदल डॉ.रूधिरा जाधव यांनी उपस्थीत विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर भारत विद्यालय सोसायटीच्या अध्यक्षा डॉ.सीमाताई आगाशे, सौ.दीपाली पाटील व सौ.स्मिता बांगडभट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थी मंत्रीमंडळातील विद्यार्थिनींच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना पौगंडावस्थेत मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात. हे बदल समजून घेऊन त्यानुसार जीवनशैली अंगीकारणे आवश्यक असते. विद्यार्थिनींना मासिक पाळीची स्वच्छता, मासिक पाळी म्हणजे काय डायमेनोरीया टाळण्यासाठी आहारात काय समाविष्ट करावे, सामान्य काय असामान्य काय,सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट कशी लावावी,मासिक पाळीच्या संदर्भात मिथक आणि तथ्ये काय आहे, हे वरदान की शाप ? यासह अनेक विषय ज्यावर मुलींच्या मनामध्ये संभ्रम असतात याबद्दल डॉ.रुधिरा जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींच्या समस्या जाणून त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत स्त्री आरोग्य विषयक अनेक गैरसमज दूर केले. यावेळी वर्ग सात ते दहाच्या विद्यार्थिनी व शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या आरोग्य मंत्री प्रार्थना जयस्वाल तर आभार प्रदर्शन खुशी कुलकर्णी यांनी मानले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)