संजय पराडके
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार : नगरपंचायत धडगाव वडफळ्या रोषमाळ बु! येथे विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून मिळावा यासाठी खासदार डॉ. हिनाताई गावित यांना निवेदनदेण्यात आले. धडगाव नगरपंचायत धडगाव वडफळ्या रोषमाळ बु! येथील वार्ड क्र. 1मधील भारतीय जनता पार्टीची नगरसेविका ललिता तुकाराम पावरा यांनी वार्ड क्र.1,2,3,14,16,17 मधील वेगवेगळ्या विकास कामांची मागणी माननीय खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे. आम्हाला आमच्या नगरपंचायत विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणे अशीच मागणी केली आहे. या संदर्भात निवेदन ताईंना निवेदन देतांना तुकाराम पावरा, इंजि. जगन पराडके, शिवाजी कालूसिंग पराडके (सेवानिवृत्त PI), विरसिंग पावरा, शामु पराडके, गोरज्या पाडवी, प्रा. रतिलाल पावरा, तसेच धडगाव तालुक्यातील भा. ज. पा. चे आधी कार्यकर्ते व तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.