कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : शेतकरी माय बापांचा एकमेव पोळा हा सण दिवसेंदिवस लोप पावत चाललेला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरालगत असलेल्या ग्रामपंचायत श्रीरामपूर यांनी पोळा हा सण साजरा करण्याचे ठरविले .व याकरिता त्यांनी बैल जोडी सजावट, बैलजोडी ठेवणे, शरीर बांधा, अशा प्रकारची स्पर्धा घेऊन ग्रामीण जनते मध्ये एक चांगले उदाहरण दिले. याकरिता ग्रामपंचायत श्रीरामपूर यांनी प्रोत्सानास्पद. प्रथम पारितोषिक 3001 रुपये, द्वितीय पारितोषिक 2001 रुपये, तृतीय पारितोषिक 1001 रुपये चतुर्थ पारितोषिक 701 रुपये व भाग घेणाऱ्यांना पाचशे रुपये सर्वच जोड्यांना देण्यात आले. यावेळेस विशेष म्हणजे सहभागी बैल जोडी मालक व संभाळणारा यांना मानाचा फेटा बांधून त्यांचे अभिनंदन केले खरोखरच आज रोजी पोळा हा सण पुढील पिढींना माहिती झाला पाहिजे. याकरिता त्यांनी हे राबवलेले पाऊल वाखाण्यासारख्या आहे. यावेळेस उपस्थितांमध्ये पिपळगाव सूतगिरणी चे उपाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती भाऊ नाईक यांच्या हस्ते पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. श्रीरामपूरचे सरपंच आशिष काळबांडे यांनी या ठिकाणी सर्वच लोकांचे आभार मानले. यावेळी वसंत नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नाचणकर साहेब, माजी सरपंच मिलिंद उदयपूरकर, ग्रामपंचायत सदस्य विजय राठोड, दिनेश राठोड, राहुल सहारे, परेश पांगारकर, मधुकर कलिंदर, वीरेंद्र इंगोले, सचिव अनिल भगत तंटामुक्ती अध्यक्ष विजय वाढते . तर आयोजक म्हणून प्रमोद कदम, गोविंदराव कदम व अन्य गावकरी मंडळी यांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी बळीराजा यांचे मनोधैर्य वाढवण्याकरिता शपथ घेण्यात आली. प्राध्यापक नरेंद्र जाधव, धर्माळे सर यांनीही शपथ सर्व गावकरी लोकांना घेण्यास लावले.


