सचिन संघई
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या विधीसेल वाशिम जिल्हाध्यक्ष पदी काल भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या हस्ते पळसखेड येथील अँड. हिरामण काशीनाथ मोरे यांची निवड करण्यात आली. साहीत्य, समाजकारण आणि कायदे तज्ञ असलेल्यां मोरे आणि त्यांच्या परिवाराला अनेक वर्षांपासून चळवळीचा वारसा लाभलेला आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटनेची कायदेशीर बाजु मांडण्यांसाठी तधा भूमिपुत्र ला मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आसल्याचे नियुक्तीनंतर मोरे यांनी सांगीतले यावेळी भूमिपुत्र चे सो. मि. जिल्हाध्यक्ष पवन खोंडकर, उखळकर , डॉक्टर राम बोडखे, गणेश हुले आदींची प्रमुख्याने उपस्थिती होती.