कानपूर : नुकताच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा पार पडला. यानंतर आता सर्वांचे लक्ष्य उद्या होणाऱ्या मतमोजणीवर आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी 10 मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, कानपूरमधील मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी एसपी स्वप्नील ममगाई यांनी गोंधळ घालणाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. कानपूर देहतचे डीएम जितेंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यांनी 10 मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत डीएमसह एसपी स्वप्रिल ममंगाई उपस्थित होते. मतमोजणीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांना आणि मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत अडथळा आणणार्यांना किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरविणार्यांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत असा आदेश देण्याची यूपीमध्ये ही पहिलीच वेळ आहे. मतमोजणी प्रक्रियेचे उल्लंघन करणाऱ्यांना जागेवरच गोळ्या घालण्याचे आदेश आश्चर्यचकित करणारे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2017 च्या तुलनेत यावेळी कमी हिंसक घटना घडल्या आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत हिंसाचाराच्या एकूण 97 घटना घडल्या. तर यावेळी जवळपास 33 घटना समोर आल्या आहेत. पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार, 9 जानेवारी रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर, राज्यभरात 1339 एफआयआर नोंदवण्यात आले, तर लखनौ झोनमध्ये सर्वाधिक 261 एफआयआर नोंदवण्यात आले. यासोबतच कानपूरमधूनच सर्वाधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान, एसपी म्हणाले की, मतमोजणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत केली जाईल, ज्यामध्ये कानपूर ग्रामीण भागातील पोलीस आणि प्रशासनाकडून मतमोजणी प्रक्रियेसाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था तीन कोनातून तयार करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाभरातून 1500 पोलीस, 2 कंपनी CISF, 2 कंपनी CRPF, 1 कंपनी PAC तैनात करण्यात आले आहेत.
कानपूर देहाटचे एसपी म्हणाले की, शांततेत मतमोजणी पार पाडण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी वातावरण बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या कालावधीत कोणी अफवा पसरवल्यास त्याच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला, तर गोळीबार करण्याच्या सूचनाही देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.