सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी
अनसिंग : येथील श्री पद्मप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. वैशाली गोरे, प्रमुख अतिथी म्हणून राजश्रीताई वाळली,अनुसयाबाई तायडे व बी ए भाग एक ची विद्यार्थिनी कु. प्रिया जाधव ही उपस्थित होती. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जगभर कशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात, महाविद्यालयामध्ये सुद्धा महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने, सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करतो याबाबत आपल्या प्रास्ताविका मधून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सचितानंद बिच्चेवार यांनी विशद केले. महाविद्यालयाचा बी ए भाग एकचा विद्यार्थी ह. भ. प. आकाश घुगे हा उत्तम कीर्तनकार असून त्याने आपल्या अभूतपूर्व कौशल्याने महिलांच्या सद्यस्थिती व भविष्याच्या दृष्टिकोनातून सुंदर स्वरूपाचे मनोगत व्यक्त करतांना, महिला स्वातंत्र्याचा सन्मान करतांना आई-वडिलांच्या ह्दयाचा विचार करून मुलीनीं आयुष्यात प्रगतीचा पाऊल टाकावी असा सुंदर संदेश दिला. याच वेळी बीए भाग 1 च्या विद्यार्थिनींनी भ्रूण हत्या व स्त्री सन्मान या संदर्भाने एक सुंदर मूक नाटिका सादर केली. यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्रा. वैशाली गोरे यांनी महिलांचा एक दिवस नव्हे तर नेहमीसाठी सन्मान व्हायला हवा त्यांना समान दर्जा मिळायला हवा याबाबत आपले भाष्य केले. कार्यक्रमाचे संचालन इश्वर चव्हान तर आभार प्रदर्शन आकाश घटमाल यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.


