विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : पातुर नंदापुर येथील शेतकरी शामराव रामजी सोनवणे वय अंदाजे 65 वर्ष स्वतःच्या शेतात सागाच्या झाडाला गळ्याला फास लावून आपली जीवन यात्रा संपवली. पातुर नंदापूर येथील शामराव सोनवणे यांचे कवळा ता. मुर्तीजापुर शिवारामध्ये दोन एकर शेत आहे. शेतात हरभरा सोगण्याचे काम चालू होते. दि, 7 मार्च च्या रात्री आपल्या शेतात रखवाली करण्याकरिता गेले असता. स्वतःला सागाच्या झाडाला गळफास लावून रात्री आत्महत्या केली. 8 मार्च सकाळी 9 च्या दरम्यान घरच्या लोकांना माहिती मिळाली. शामराव शेतकरी असून सततच्या नापिकीमुळे व कर्जामुळे आपल्या घरचा गाडा कसा ओढायचा या चिंतेत त्यांनी आपले जीवन यात्रा संपवली. त्यांच्यामागे मुलगा ,पत्नी असा परिवार आहे. पिंजर पोलिस स्टेशनचे बीड जमादार राजू वानखेडे. अभिजीत शिरसाठ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून शेव पीएम साठी मूर्तिजापूर येथे रवाना केले. पुढील तपास ठाणेदार अजय कुमार वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू वानखेडे करीत आहेत.


