विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला | पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या घोटा या गावांमधील सरपंच प्रकाश काटे यांनी दि.3 मार्च रोजी पिंजर पोलीस स्टेशन मध्ये माझ्या गोडाऊन मधून दोन कट्टे तुरीचे अज्ञात इसमाने चोरून नेल्याची तक्रार दिली . अज्ञात इस्मा विरोधात461/380 भा द वि गुन्हा दाखल करण्यात आला होता.असता. पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजय कुमार वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट इन्चार्ज राजू वानखडे, अभिजीत शिरसाट,यांनी दोन तुरीचे कट्टे 1 क्विंटल 60 किलो आणि अज्ञात इसमाचा शोध घेणे सुरू केले. दोन दिवस संपूर्ण गावांमध्ये चौकशी करून शोध घेतला असता आणि गुप्त माहिती मिळाल्याने गावातीलच आरोपी गणेश रामकृष्ण ब्राह्मणकर, रवींद्र गजानन हत्ती मारे, रा. घोटा यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात आली. आणि या आरोपी जवळील दोन कट्टे तूर160 किलो किंमत10,500 रुपयाचा माल जप्त केला आहे. या आधीही राजू वानखडे, अभिजीत शिरसाट, यांनी दबंग कारवाई केल्यामुळे अवैद्य धंदे वाल्यां चे व चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. पुढील तपास पिंजर पोलीस स्टेशन करीत आहे.