महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती तर्फे दि.८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता येथील राजवंदन सभागृहात महिला मेळावा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल धानोरकर राहणार असून वरो-याच्या तहसीलदार रोशन मकवाने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून स्वाती धोटकर, वैशाली वराटे, डॉ.माला प्रेमचंद, डॉ.प्रिया शिंदे, डॉ.मनिषकुमार सिंग उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून न.प.उपाध्यक्ष संतोष आमने, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर उपस्थित राहणार आहेत.आरोग्य शिबिरात डॉ.श्वेता शिंदे, डॉ.मयुरी अवताडे, डॉ. प्रवीण केसवानी, डॉ.मनोज हक्के, डॉ. विनय कुंभारे आरोग्य तपासणी करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन न.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सरिता सूर यांनी केले आहे.