किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक कामे खोळंबलेल्या अवस्थेत आहेत.येथील कष्टकरी शेतकरी, व्यापारी,छोटे छोटे उद्योगधंदे करणारे उद्योजक यांना उभारी देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध समस्यांवर मात करून हा भाग विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रामुख्याने शेतकरी वर्गाला आपल्या शेतात जाण्यासाठी शेतातील माल बाजारात आणण्यासाठी उत्तम दर्जाचे शेतरस्ते करणे,पाण्याच्या साठवणूकीसाठी शेततळे,नदीवरील कोल्हापुरी बंधारे,विविध फळबाग,फुलशेती करण्यासाठी व उत्पादीत केलेल्या मालाची साठवणूक करण्याकरिता छोट्या छोट्या गोदामांची व्यवस्था व्हावी यासाठी मागेल त्या प्रत्येक शेतकऱ्यास अनुदानित कर्ज उपलब्ध करण्यात आले पाहीजे.व्यापारांना दुकानाचे गाळे उपलब्ध करावे.ग्रामपंचायतच्या प्रभावी योजना गरजु नागरिकांपर्यंत तातडीने पोहचायला हव्या.प्रामाणीकपणे आपल्या कर्तव्याची जान ठेवून चांगले काम करणारे ग्रामसेवक,तलाठी व इतर अधिकारी यांना शासनामार्फत सन्मानीत करून त्यांच्या पदोन्नतीसाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे अशा स्वरूपाच्या विविध मागण्यांकडे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे लक्ष वेधले असे पातुर तालुका विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी यावेळी सांगितले आहे.










