शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि अकोट
अकोट : बोर्डी येथे दी.५मार्च ला रा. काँ.च्या संवाद दौर्यानीमीत्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आ.अमोल मीटकरी,जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे यांच्या नेतृत्वात व विधानसभा अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर यांच्या मार्गदर्शनात बोर्डी येथे संवाद दौरा व आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी प्रमुख उपस्थितीत रा.का.चे तालुकाध्यक्ष कैलाश गोंडचर होते,प्रमुख अतीथी रा.का.ओबीसी सेल तालुकाध्यक्ष नरेंद्र कोंडे, ओबीसी सेल महीला तालुकाध्यक्ष मिना मनीष तळोकार हे होते. संवाद दौरा निमित्त बोर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकऱ्यांसोबत चर्चा करण्यात येउन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.येथील ग्रामस्थांनी गावातील समस्या चा पाढा वाचून त्याचे निराकरण तालुकाध्यक्ष कैलास गोडचर यांनी केले, कामांचा ग्रामपंचायत ठराव द्या त्याचा पाठपुरावा करून नक्की तुमच्या गावाला भरीव मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी उल्हास कुलट सचीव रा.का.अकोटतालुका,ग्रा.पं.सदस्य साजीद शेख यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मनीष तळोकार यांनी तर आभार प्रदर्शन सुनील गेबड यांनी केले.

यावेळी जि.प. शाळेला सर्व मान्यवरांनी भेट देऊन शाळेच्या कामाबद्दल व शाळेतील विविध उपक्रमाबद्दल गौरोउद्गार काढले.कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा संघटक महेश ढोकणे तालुका कार्याध्यक्ष सुनील पाटील गेबड, मनीष तळोकार रघुनाथ तळोकर,माजी महिला तालुकाध्यक्ष छबुताई तळोकार, रामभाऊ नाचणकार,गोपाल कळस्कार,गजानन शेडगे,संतोष शेळके,किशोर लटकुटे, खांदेल, विठ्ठल येवोकार,प्रमोद नाचणकार,यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होती.











